Essay on Importance of Trees in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.
मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे ही या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य आहे.
झाडाचे महत्त्व वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Importance of Trees Essay in Marathi
Set 1 is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.
- झाडांना मानवी आयुष्यात खूप महत्त्व आहे.
- त्यांच्याकडून आपणास ऑक्सिजन मिळते.
- झाडे मानवी आयुष्यासाठी खूप उपयोगी आहेत.
- त्यांच्यापासून अनेक औषधी बनविता येतात.
- आपल्या घरातील लाकडी वस्तू त्यांच्यापासूनच बनवल्या जातात.
- झाडाच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात.
- झाड आणि वनस्पतींपासून आपणास फळे आणि भाज्या मिळतात.
- त्यांच्यापासून आपणास सुंगधी फुले मिळतात.
- झाडे आपणास सावली देतात.
- म्हणूनच आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (१०० शब्दांत)
Set 2 is Helpful for Students of Classes 5, 6, 7 and 8.
मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे ही या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य आहे. झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. तसेच जगण्यासाठी लागणारे अन्न आपल्याला झाडांमुळेच प्राप्त होतो. झाडे सूर्यप्रकाशातून उर्जा घेऊन हे अन्न तयार करतात.
तसेच काही झाडांपासून औषधी तयार केल्या जातात. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडापासून अनेक जीवनापयोगी वस्तू बनवल्या जातात. तसेच वह्या पुस्तकांसाठी लागणारा कागददेखील झाडांपासूनच बनतो. अशा प्रकारे झाडे ही मानवाला सर्व क्षेत्रात निस्वार्थपणे मदत करतात.
परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी याच झाडांना हानी पोहचवण्यास सुरुवात केली आहे. जंगलतोड करून तो इमारती उभ्या करू लागला आहे आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहचत आहे आणि मानवाच्याच जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे, आपण झाडांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून कृतज्ञतेने जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (२०० शब्दांत)
Set 3 is Helpful for Students of Classes 9, and 10.
मनुष्य आणि झाडे यांच्यात नेहमीच एक सखोल संबंध राहिला आहे. कारण हे नैसर्गिक घटक एकमेकावर अवलंबून आहेत. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायू ऑक्सीजनवरच मानव जिवंत राहू शकतो, तर मानवावासून मिळणाऱ्या कार्बनडाय-ऑक्साईड पासून आणि सूर्यप्रकाशापासून झाडांना त्यांच्या विविध प्रक्रियांसाठी ऊर्जा मिळते.
झाडे फार परोपकारी आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य जगाच्या सेवेत व्यतीत होऊन जाते. झाडे आपल्याला थंड सावली देतात. आपल्याला त्यांच्याकडून फळे आणि फुले मिळतात. आपल्याला घर आणि फर्निचरसाठी लागणारे लाकूड झाडांकडूनच मिळते.
बऱ्याच झाडांची मुळे, देठ आणि पाने यांपासून औषधे बनवली जातात. झाडांमुळे वातावरणातील हवा शुद्ध राहते. झाडांमुळे वातावरणाचे चक्र संतुलित राहते आणि पाऊसही जास्त पडतो. झाडांची हिरवीगार पाने आणि रंगबेरंगी फुले वातावरणाला सुंदर बनवतात.
खरोखर, झाडे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. झाडांच्या सहवासात राहून माणूस निरोगी राहतो. आपले ऋषी-मुनी वनांमध्येच राहायचे. आपले प्राचीन गुरुकुल देखील वनांमध्येच असायचे. म्हणूनच भारतीय जीवन झाडे आणि वनस्पतींशी सखोलतेने जुळलेले आहे.
परंतु आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत. यामुळे वने आणि जंगले नष्ट होत आहेत. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी होऊ लागला आहे. पाण्याअभावी बर्याचदा आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे, त्यात असंख्य लोकांचे प्राण जात आहेत. तर प्रदूषणामुळे वातावरण दुषित होत आहे, लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (३०० शब्दांत)
Set 4 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.
पृथ्वीतलावावर जीवन शक्य आहे याचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग. कारण पृथ्वी हा संपूर्ण विश्वातील एकमेव ग्रह आहे जिथे झाडे आणि वनस्पती आहेत. आपण झाडांना देवाचेच रूप मानले पाहिजे, त्यांच्यामुळेच येथे सर्व जीवांचे जीवन शक्य झाले आहे.
झाडांना आपण हिरवे सोने देखील म्हणतात, कारण संपूर्ण पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टींशी झाडांची तुलना केली जाऊ शकत नाही, झाडे आपल्याला अतिशय मौल्यवान गोष्टी प्रदान करतात. झाडांपासून आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन प्राप्त होतो. याशिवाय हिरव्या भाज्या, फळे इत्यादी जीवनावश्यक गोष्टी आपल्याला झाडांपासूनच मिळतात. निसर्गाने केलेल्या या परोपकाराची आपल्याला कधीच परतफेड करता येणार नाही.
मानवजातीच्या विकासात निसर्गाचा मोठा वाटा आहे. प्राचीन काळातील पाषाण युगापासून आजच्या नवीन युगापर्यंत, प्रत्येक प्राणी झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून राहून जीवन जगत आला आहे. झाडांपासून इतर बऱ्याच मौल्यवान वस्तू बनतात, तुळस, आवळा, कडुनिंब अशी अनेक झाडे औषधे म्हणून वापरली जातात. पृथ्वीवर पावसाचे मुख्य कारण म्हणजे झाडे, ज्यामुळे शेती व इतर घरगुती कामांसाठी पाणी उपलब्ध होते. झाडांमुळे वातावरणातील संतुलन कायम राहते. झाडे आणि वनस्पती पृथ्वीवर सर्वात शुद्ध वातावरण तयार करतात. झाडांमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूमि प्रदूषण कमी होते.
झाडांपासून मिळणारे लाकूड घरे, फर्निचर, खेळणी, सजावटीसाठी फर्निचर इत्यादींसाठी वापरले जाते. कोणत्याही देशाच्या विकासात शिक्षणाला एक महत्त्वाचे स्थान असते, परंतु अभ्यासासाठी जी पुस्तके वापरली जातात त्यांना लागणारा कागददेखील झाडांपासूनच तयार केला जातो.
निसर्गाने मानवांना बरेच काही दिले आहे, परंतु त्यानंतरही माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करतो. जंगले नष्ट करून माणूस तेथे इमारती उभ्या करतोय. दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाने नवीन उद्योग तयार होत आहेत, उद्योग बांधण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे झाडे तोडली जात आहेत आणि मोठ्या उद्योगांमधून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळेही निसर्गाचे नुकसान होत आहे.
सुपीक जमीनीवर झाडांची लागवड न केल्याने त्या जमिनीचे वाळवंटात रुपांतर होत आहे. दररोज झाडे तोडल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि हवामान, नैसर्गिक आपत्ती इत्यादींच्या अनिश्चिततेचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत आहे. पूर, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, उपासमार इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे आणि झाडे नष्ट झाल्याने मानवासोबत वन्यजीवांचेही जीव धोक्यात आले आहेत.
वृक्ष ही पृथ्वीची एक मौल्यवान मालमत्ता आहे, म्हणूनच सरकारने तिच्या संरक्षणासाठी कठोर कायदे केले पाहिजेत. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरुन पृथ्वीचे हिरवे सौंदर्य टिकेल.
झाडे आपल्याला अनेक मौलिक वस्तू तर देतातच, पण झाडांकडून आपण अजून एक गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे ‘सर्वांशी समान वागणूक’. म्हणून माणूस जसा आपल्या मुलाबाळांशी वागतो, तसेच त्याने झाडांशीही वागले पाहिजे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ‘एक तरी झाड जगवा!’ या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तरच ही वसुधा पुन्हा ‘हरीतश्यामल’ बनेल.
झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi (४०० शब्दांत)
Set 5 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.
झाडे ही मानवाचे मित्र आहेत. झाडे मानवाच्या आयुष्यात अनेक भौतिक समस्यांमध्ये सहाय्य करतात. आपल्या प्राचीन ग्रंथांनी आणि आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झाडांचे महत्व आपल्याला पटवून दिले आहे. आपले धर्मग्रंथ तर वृक्षांना देवासमान समजतात. गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे’. पिंपळाच्या खाली बसूनच भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले होते.
आज विज्ञानाने सिद्ध केले आहे की सर्वात अधिक प्राणवायू आपल्याला पिंपळाच्या झाडापासूनच मिळतो. तुळशीच्या मूळरुपात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. तुळशीची पाने, बियाणे सर्व रोगोपचारांमध्ये उपयोगी आहेत. हेच कारण आहे की, तुळशीचे रोप आज प्रत्येक भारतीय घरात पाहायला मिळते. तसेच अशोकाच्या पानांपासूनही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी बनवल्या जातात.
लिंबाच्या झाडाबद्दल तर काय बोलावे? याची उपयोगिता अवर्णनीय आहे. लिंबाचा रस, पाने, बियाणे सर्वच उपयोगी आहे. लिंबाचे खरंच मानवाला खूप फायदे आहेत म्हणूनच म्हटले जाते, ‘सर्वरोग हरो निम्बः’. मानवांना जवळजवळ सर्व वन संपत्तीचा फायदा होतो. फळे देणारी वृक्षे तर माणसासाठी वरदानच आहे. शाकाहारी भोजन फळांशिवाय असंतुलित मानले जाते. आंबे, द्राक्षे, पपई, केळी अशा सर्वच फळांचा गोडवा आणि पौष्टिकता तर सर्वांना माहितच आहे.
झाडांमुळे चांगला पाऊस पडतो, भूरक्षण होते आणि वायू प्रदूषण कमी होते. एवढेच नाही, लाख आणि रेशीमचे कीटक झाडांवर भरभराट करतात. कागद पाइन आणि बांबूपासून बनविला जातो. याशिवाय इमारत बांधकाम आणि फर्निचर इ. मध्ये लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे लाकडाची उपयुक्तता तर सर्वज्ञात आहे. अशा प्रकारे, मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत झाडे त्याची सोबती असतात. झाडे आपल्याला नैतिकता आणि परोपकाराचा संदेश देखील देतात.
आजचे भौतिकवादी मानव आपल्या सुख-सुविधेसाठी झाडांची अंदाधुंद कापणी करीत आहे. यामुळे पृथ्वीवरील वन क्षेत्राची टक्केवारी कमी होत आहे आकडेवारीवरून असे दिसून येते की पर्यावरणीय समतोलतेसाठी पृथ्वीवरील भूभागाच्या 33 टक्के वन असणे आवश्यक आहे. झाडांची कापणी, मानवी लोकसंख्येत वाढ, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर आणि आण्विक चाचण्या आपले वातावरण दूषित करत आहेत. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. सर्वात धोकादायक गोष्ट तर अशी आहे की ओझोनच्या थराचे सतत ऱ्हास होत आहे.
या संकटापासून मुक्त होण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे हाच आहे. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. मानवाला आपल्या जीवनातील झाडांचे महत्व कळत नाही आहे. वृक्षांची लागवड करणाऱ्या लोकांना शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे आणि या पवित्र कार्यात त्यांना आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. वृक्षारोपणाच्या कार्याचा वीस सूत्री कार्यक्रमात समावेश केला पाहिजे. जनतेच्या पाठबळाद्वारे हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ध्येय असले पाहिजे. तेव्हाच ‘झाडे लावा देश वाचवा’ ची घोषणा प्रत्यक्षात साध्य होऊ शकेल शकेल.
अशा प्रकारे मानवी जीवनात झाडांचे महत्व अतुलनीय आहे, झाडांशिवाय आपण मानवी जीवनाची आणि निसर्गाची कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच या निसर्गाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करून वृक्षारोपण केले पाहिजे.
तर मित्रांनो झाडाचे महत्त्व मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi Language हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा हा निबंध Share करू शकता, धन्यवाद.